तरसोद हायवे वरील पूल मातीचा भराव टाकून शेतकऱ्याने केला बंद; नैसर्गिक पाण्याचा प्रवाह मोकळा करून देण्याबाबतचे माजी जिल्हा उपाध्यक्ष लालचंद पाटील यांचे निवेदन.
जळगाव/मुख्य संपादक चंदन पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव परिसराचे चारही बाजूंनी विस्तारीकरण होत असून जळगाव शहर एक मोठा आकार घेत आहे. यात मात्र नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद करण्याचे तसेच, पाण्याचा प्रवाह बदलण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. असाच एक प्रकार समोर आला असून, तरसोद शिवारातील शेत गट नं. २४४ नॅशनल हायवे क्र. ५३ ला लागून असलेल्या शेतमालकाने नाल्यावरील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवील्या बाबतचे निवेदन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी उपविभागीय अधिकारी जळगांव यांना दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की, तरसोद शिवारात जळगाव भुसावळ हायवे क्र. ५३ च्या लगत गट नं. २४४ हे शेत असून सदरील शेताच्या पश्चिमेकडील भागातून पूर्वापार असा मन्यारखेडा व तरसोद या दोन्ही शिवारातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यासाठीचा नाला आहे. सदर नाल्याला पावसाळयात मोठ्या प्रमाणात पाणी येते, हे पाणी हायवे पलीकडे जाण्यासाठी नॅशनल हायवे विभागाने या ठिकाणी पूर्वी पासून पुल बांधलेला होता. आज रोजी हायवे च्या चौपदरी करणामुळे त्याठिकाणी N.H.A.I. जळगांव यांनी नवीन हायवे तयार करतांना नाल्याला येणाऱ्या पाण्याचा पातळीचा सर्व्हे करून, अगोदर अस्तित्वात असलेल्या छोट्या पुलाचे मोठ्या पुलात रूपांतर करून नवीन मोठा पुल बांधण्यात आलेला आहे.
आज रोजी असा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यासाठी स्वयंस्पष्ट नाला अस्तित्वात असून सुद्धा सदरील गट क्र. २४४ चे शेत मालकाने तो नाला पूर्णपणे माती भरून बुजल्याचे दिसत आहे. हा नाला बुजल्यामुळे तरसोद व मन्यारखेडा निवारातील पावसाचे पाणी अडकून हायवे वर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता असून या ठिकाणाची उपविभागीय अधिकारी जळगांव यांनी स्थळ निरीक्षण करून, संबंधितांना नैसर्गिक पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यासंदर्भात योग्य ते निर्देश देऊन सहकार्य करण्याबतेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. या बाबत N.H.A.I. चे जळगांव प्रकल्प संचालक यांनाही निवेदनाची कॉपी देण्यात आली आहे.