Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअ‍ॅड. प्रेमानंद इंद्रजीत पुन्हा अध्यक्षपदी नंदुरबार वकील संघाची निवडणूक शांततेत संपन्न

अ‍ॅड. प्रेमानंद इंद्रजीत पुन्हा अध्यक्षपदी नंदुरबार वकील संघाची निवडणूक शांततेत संपन्न

नंदुरबार | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नंदुरबार जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या २०२५ सालच्या कार्यकारिणी निवडणुका शांततेत आणि उत्साहात पार पडल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. प्रेमानंद इंद्रजीत यांनी विजयी होत पुन्हा अध्यक्षपदावर कब्जा केला.

या निवडणुकीत अ‍ॅड. के. एफ. दाऊलवाला यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. अ‍ॅड. तरंग देसाई व अ‍ॅड. गणेश बैरागी सहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्त होते. अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. कमलाकर सावळे, अ‍ॅड. मनोज मोरे व अ‍ॅड. प्रेमानंद इंद्रजीत यांच्यात चुरशीची लढत झाली. अंतिम फेरीत अ‍ॅड. इंद्रजीत विजयी ठरले. उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. सावंत वळवी, तर सहसचिवपदासाठी श्री. मोहन गिरसे यांची बिनविरोध निवड झाली. सचिवपदासाठी अ‍ॅड. सारंग गिरनार व अ‍ॅड. संजय पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. अ‍ॅड. गिरनार यांनी अंतिम विजय मिळवला.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. विजयी उमेदवारांचे वकील संघाच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या