Thursday, April 9, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनाशिकमध्ये MNC कंपनीत महिलांवर छळ प्रकरण उघड; ९ गुन्हे नोंद, ६ जण...

नाशिकमध्ये MNC कंपनीत महिलांवर छळ प्रकरण उघड; ९ गुन्हे नोंद, ६ जण अटकेत – SIT मार्फत तपास सुरू.!

नाशिक | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांवर विनयभंग, लैंगिक तसेच मानसिक छळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल केले असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीत काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून महिलांना वारंवार त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यामध्ये केवळ विनयभंगच नव्हे, तर मानसिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याचेही प्रकार समाविष्ट आहेत. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेले विशेष पथक या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी करत आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व खासगी कंपन्या आणि आस्थापनांना कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच, छळाला बळी पडलेल्या महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, याचीही हमी देण्यात आली आहे.

संपर्कासाठी :
CP WhatsApp : ९९२३३२३३११
नियंत्रण कक्ष : ११२

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या