Tuesday, April 7, 2026
police dakshta logo
Homeक्राईमस्वेच्छेने भोंदूबाबा कडे गेलेल्या महिलांनाही जबाबदार धरा व त्यांच्यावरही कारवाई करा; सामाजिक...

स्वेच्छेने भोंदूबाबा कडे गेलेल्या महिलांनाही जबाबदार धरा व त्यांच्यावरही कारवाई करा; सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नाशिक प्रकरणाला नवे वळण; महिलांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित

नाशिक | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू ज्योतिष प्रकरणात नवे वळण आले असून, या प्रकरणातील महिलांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोपी अशोक खरात याला १७ मार्च रोजी एका महिलेच्या फिर्यादीनंतर अटक करण्यात आली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.दरम्यान, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या प्रकरणात महिलांच्या सहभागाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. उपलब्ध व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे काही महिला स्वेच्छेने आरोपीकडे गेल्याचे दिसून येते, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा महिलांना सरसकट ‘पीडित’ मानण्याऐवजी त्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सबाणे यांनी स्पष्ट केले की, ज्या महिलांना कुटुंबीयांकडून जबरदस्तीने आरोपीकडे पाठवण्यात आले, त्यांनाच पीडित म्हणून ग्राह्य धरणे योग्य ठरेल. याशिवाय, संबंधित प्रकरणात माजी महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे.ओकस कॉर्नर परिसरातील कार्यालयातून भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आरोपी महिलांना अमली पदार्थ देऊन त्यांचे शोषण करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सुशिक्षित महिलाही अशा प्रकारच्या भोंदूगिरीला कशा बळी पडतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या नव्या घडामोडींमुळे प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या