Wednesday, April 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनाशिकमध्ये व्यावसायिक एरंडे याचा भोंदूगिरीचा पर्दाफाश; संशयिताच्या कार्यालयातून आक्षेपार्ह साहित्य जप्त

नाशिकमध्ये व्यावसायिक एरंडे याचा भोंदूगिरीचा पर्दाफाश; संशयिताच्या कार्यालयातून आक्षेपार्ह साहित्य जप्त

नाशिक | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- लैंगिक शोषण प्रकरणात अटक असलेल्या ६३ वर्षीय व्यावसायिक रवींद्र एरंडे याच्याविरोधातील तपासादरम्यान गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर येत आहेत. महिलांना विविध आमिषे दाखवत फसवणूक आणि भोंदूगिरी केल्याचा संशय अधिक बळावला असून, त्याच्या कार्यालयातून सापाची कात, पक्ष्यांचे अवयव तसेच इतर संशयास्पद वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.या प्रकरणात न्यायालयाने एरंडेच्या पोलिस कोठडीत वाढ करत तपासासाठी आणखी चार दिवसांची मुदत दिली आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून त्याची सखोल चौकशी सुरू असून, पुढील तपासात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सुरुवातीला खंडणीच्या आरोपांमुळे उघडकीस आलेल्या या प्रकरणात तपासाची दिशा बदलली. संबंधित व्यावसायिकाच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल माध्यमांत अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळून आले. यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत सात महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदवल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.विशेष म्हणजे, या प्रकरणाचा भांडाफोड स्वतःच्या कर्मचाऱ्याने रचलेल्या सापळ्यामुळे झाल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर घडामोडींना वेग आला आणि तपासात नवे पैलू उलगडत गेले.

सोमवारी न्यायालयीन प्रक्रियेनंतर एरंडेला पुढील चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या युनिटमध्ये नेण्यात आले. यावेळी बाहेर येताना त्याने चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केल्याचेही पाहायला मिळाले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या