Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला ; मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून तीव्र निषेध

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला ; मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून तीव्र निषेध

नाशिक | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असलेल्या नाशिकच्या काही पत्रकारांवर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय असल्याचे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार मंगेश चव्हाण व कार्यकर्ते होते. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करताना त्यांनी सांगितले की, दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून कठोर कारवाई करण्यात येईल.

काल झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्रकार किरण ताजणे यांची मंत्री.गिरीश महाजन यांनी नाशिक येथील अपोलो रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी आ.मंगेश चव्हाण,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीसाठी धोकादायक असून अशा घटना कुठल्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या