Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeजळगावनाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षक आ. किशोर दराडे यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या प्रलंबित...

नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षक आ. किशोर दराडे यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर महत्त्वपूर्ण बैठक

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या चारही जिल्ह्यांतील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कनिष्ठ प्राध्यापक यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षण उपसंचालक राठोड, सहाय्यक शिक्षण उपसंचालक देवरे, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी, तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक उपस्थित होते.

शिक्षक नेते एस. डी. भिरूड, संभाजी आप्पा पाटील व संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत शालार्थ ड्रॉप, वैद्यकीय बिले, अनुकंपा मान्यता, वैयक्तिक मान्यता, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक मान्यता, कनिष्ठ महाविद्यालयीन थकीत वेतन, स्वयंअर्थशाळा प्रस्ताव, वाढीव तुकडी, अतिरिक्त समायोजन तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांच्या फेरमान्यतेसह विविध शैक्षणिक प्रश्नांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.या प्रसंगी प्रा. सुनील गरुड, प्रा. शैलेश राणे, निलेश खलसे, भदाणे सर, संदीप डोलारे, अरुण सपकाळे, डिगंबर पाटील, डी. ए. पाटील, एस. के. पाटील, गोपाळ महाजन, सिद्धेश्वर वाघुळदे, राजू महाजन, तुळशीराम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीदरम्यान शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या शिक्षण उपसंचालक श्री. राठोड यांच्यासमोर मांडत, येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे ठाम आश्वासन दिले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या