Tuesday, September 17, 2024
police dakshta logo
Homeनाशिकचांदवडला येत्या महिन्यात प्रॉपर्टी एक्स्पो..! शहरात अभियंता दिवस साजरा..

चांदवडला येत्या महिन्यात प्रॉपर्टी एक्स्पो..! शहरात अभियंता दिवस साजरा..

चांदवड/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर(इंडिया)चांदवड सेंटरच्या वतीने दि.15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंजि.सुनील भोर(राष्ट्रीय अध्यक्ष, प्रैक्टिसिंग व्हल्लूअर असोसिएशन ऑफ इंडिया) हे उपस्थित होते.त्यांनी इमारतींचे मूल्यांकन, नगर विकास व्यवस्थापन, नियंत्रण विकास नियमावली आणि नागरिकांचा सहभाग या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.संस्थेचे चेअरमन इंजि.भाऊसाहेब कासव यांनी अभियंता दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.यावर्षी सेंटरच्या वतीने पहिला विशेष प्राविण्य पुरस्कार इंजि.शितल डुंगरवाल यांना प्रदान करण्यात आला.

चांदवड शहराची झपाट्याने होत असलेली वाढ पहाता येथे रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करू पहाणाऱ्या सर्वांसाठी असोसिएशन च्या वतीने येत्या महिन्याभरात ‘निकेतन-२०२४ या प्रॉपर्टी एक्स्पो चे आयोजन करणार आहे. यात शहरातील आणि आसपासचे ४० हून अधिक प्रोजेक्ट्स,३० हून अधिक बांधकाम साहित्याशी संलग्न कंपन्या,बिल्डर्स,इंजिनियर्स,जागा मालक, विकासक, बांधकाम विषयक शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध असतील याचा सर्वसामान्य नागरिकांना आणि गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल अशी माहिती सेक्रेटरी इंजि. तुषार सोनवणे यांनी दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित शहरातील सर्व अभियंते, शहरातील लोक प्रतिनिधी, पत्रकार तसेच अभियांत्रिकी चे विद्यार्थी यांचे खजिनदार इंजि.योगेश शेळके यांनी आभार मानले.इंजि.मंगेश शेळके, इंजि.योगेश जाधव, इंजि.अमोल गारे, इंजि.गणेश महाले, इंजि.गोरख मेंगाळ, इंजि. शंकर सूर्यवंशी वइ तर इंजि. सहभागी झाले होते.सदर कार्यक्रमासाठी वंडर सिमेंट, समृद्धी ट्रेडर्स वडाळीभोई आणि RRY Infra. Pvt. Ltd. Nashik यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.वैष्णवी खैरनार हिने केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या