जळगाव |प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जळगाव जिल्हा परिषदेला भेट देऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी सुरू असलेल्या योजनांची माहिती घेतली आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. बैठकीत आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, महिला व बालकल्याण, कृषी आणि पाणीपुरवठा या क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
विभागीय आयुक्तांनी स्थानिक प्रशासनाच्या कामकाजाचे कौतुक केले असून, नागरिकांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले