नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नशिराबाद पोलीस स्टेशनकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याअंतर्गत बीएनएसएस कलम १६३ अन्वये एकूण १७ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या प्रस्तावांच्या आधारे रेकॉर्डवरील १७ आरोपींना रमजान ईद निमित्त चार दिवसांसाठी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सदर कारवाईचा मुख्य उद्देश सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांनी शांततेत व सुरक्षिततेत रमजान ईद साजरी करावी हा आहे.
दरम्यान, नशिराबाद पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) योगिता नारखेडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घ्यावा.

