नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथे सकल मराठा समाज, शिव सह्याद्री प्रतिष्ठान व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सवानिमित्त २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय ऐतिहासिक शिवकालीन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील आठ वर्षांपासून हा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असून यंदाही विविध ऐतिहासिक माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे प्रदर्शन २१, २२ व २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. श्री मंगलमूर्ती मंगल कार्यालय, जळगाव-भुसावळ सर्व्हिस रोड, मोठ्या बोगद्याजवळील हॉल येथे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास, पराक्रम आणि संस्कृती यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.तसेच २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता संभाजी ब्रिगेड जळगावचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा लाभ नशिराबादमधील सर्व शिवप्रेमी तसेच ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन सकल मराठा समाज व शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चव्हाण व आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

