Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबादमध्ये 30 किलो गोवंश मांस जप्त ; कुरैशीवर गुन्हा दाखल.

नशिराबादमध्ये 30 किलो गोवंश मांस जप्त ; कुरैशीवर गुन्हा दाखल.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरातील मणियार मोहल्ल्यात रविवारी सकाळी गोवंश सदृश्य मांस विक्रीसाठी बाळगत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. नशिराबाद पोलीस स्टेशन येथे कलम 274, 325 तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5(5)(क), 9, 9-अ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.याबाबत फिर्यादी गणेश सुकाराम गायकवाड (पो.कॉ. नशिराबाद पो.स्टे.) यांनी सरकारतर्फे तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी जाबीर खान अय्याज खान कुरैशी (वय 28, रा. रहेमतपुरा, नशिराबाद, ता. जि. जळगाव) यास दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी कलम 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 04/01/2026 रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मणियार मोहल्ल्यात सईद चुन्नीवाले यांच्या बंद घरासमोरच्या सार्वजनिक मोकळ्या जागेत आरोपी गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री कामी ताब्यात बाळगताना मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून सुमारे 30 किलो वजनाचे, अंदाजे 6 हजार रुपये किंमतीचे गोवंश सदृश्य मांस तसेच एक लोखंडी कोयता जप्त केला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 6 हजार रुपये आहे.
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी भेट दिली. पोहेका प्रशांत विरणारे व पोहेका चंद्रकांत पाटील तपासात सहभागी होते. सदर घटनेनंतर परिसरात शांतता असून पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या