Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबादमध्ये गोवंश मांससाठा आढळला ; ८० किलो मांस जप्त, आरोपीस नोटीस!

नशिराबादमध्ये गोवंश मांससाठा आढळला ; ८० किलो मांस जप्त, आरोपीस नोटीस!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोवंश संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करीत सुमारे ८० किलो वजनाचा गोवंशाचा मांससाठा जप्त केला आहे. या प्रकरणी सलिम खान हयात खान (वय ६५, रा. निवास मोहल्ला, नशिराबाद, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी नोटीस देण्यात आली आहे. दि. ३० डिसेंबर रोजी पहाटे सुमारे ४.५० वाजेच्या सुमारास नशिराबाद शहरातील निवास मोहल्ला परिसरात आरोपीच्या घरासमोरच्या बाजूच्या सार्वजनिक जागी गोवंश जनावरांचे मांस विक्रीच्या उद्देशाने साठविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नशिराबाद पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता तेथे अंदाजे ८० किलो वजनाचा गोवंशाचा मांससाठा तसेच एक लोखंडी कोयता मिळून आला. दोन्ही मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार योगेश नाना वराडे तर गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलिस हवालदार रितेश चौधरी करीत आहेत. पुढील तपास नशिराबाद पोलिस ठाण्याचे पो.हे.का. प्रशांत विरनारे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या