Wednesday, April 1, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबादचा आठवडे बाजार शुक्रवार नाही तर गुरुवारीच भरणार; खंडेराव महाराज यात्रोत्सवामुळे आठवडे...

नशिराबादचा आठवडे बाजार शुक्रवार नाही तर गुरुवारीच भरणार; खंडेराव महाराज यात्रोत्सवामुळे आठवडे बाजारात बदल

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरासह परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची जाहीर सूचना देण्यात आली आहे. दिनांक ३ एप्रिल २०२६, शुक्रवार रोजी खंडेराव महाराज यात्रोत्सवाचे औचित्य साधून पारंपरिक बारा गाड्या जोडल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील नियमित आठवडे बाजाराच्या दिवशी बदल करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या सूचनेनुसार, आठवडे बाजार हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी न भरता एक दिवस आधी, म्हणजेच दिनांक २ एप्रिल २०२६, गुरुवार रोजी भरविण्यात येणार आहे. या बदलाची नोंद सर्व नागरिक, पालेभाज्या विक्रेते, फळ विक्रेते तसेच इतर दुकानदारांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या