नशिराबादमध्ये संतापजनक प्रकार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरातील भवानी नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १४ जानेवारी रोजी दुपारी घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आरोपी वडिलांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडित मुलगी ही वडील, आजी व लहान भावासह राहत असून तिच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आरोपी वडील मजुरी करून मिळणाऱ्या पैशातून दारू पिऊन वारंवार घरातील सदस्यांना शिवीगाळ व मारहाण करीत असल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून पीडितेची आजी काही दिवसांपूर्वी नातेवाइकांकडे निघून गेली होती. दि.१४ जानेवारी बुधवार रोजी दुपारी पीडित मुलगी घरी एकटी असताना हा प्रकार घडला असून या वेळी मुलीने आरडाओरड केल्याने घराशेजारी जमाव जमला ते पाहून आरोपी वडिलाने तेथून पळ काढला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आरोपी वडिलांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा पॉक्सो ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहेत.

