जळगाव/मुख्य संपादक चंदन पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह :- आज दि.2 जून रोजी नशिराबाद येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी तीन संशयित आरोपींवर विनयभंग व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस पुढील तपास करीत आहे.
सविस्तर वृत्त असे की, नशिराबाद येथे वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन पंधरा वर्षीय तरुणीने आज रोजी दि.2 जून रविवार रोजी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादिनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादी मध्ये संशयित आरोपींनी वेळोवेळी या मुलीचा पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे म्हटलें आहे. या कारणास्तव संशयित मारुफ शेख मणियार, मारुफ शेख रऊफ, रिजवान शेख मणियार सर्व (रा. मणियार मोहल्ला, नशिराबाद) यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI महेश घायतड पुढील तपास करीत आहेत.