Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeनशिराबादनशिराबादजवळ ५५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला

नशिराबादजवळ ५५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद गावाजवळ अंदाजे ५५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी (११ ऑगस्ट) दुपारी उघडकीस आली. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह दिसून आला असून, याबाबत दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नशिराबाद पोलिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीस तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

मयत पुरुषाच्या अंगावरून ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू किंवा कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी नशिराबाद पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. प्राथमिक तपास सुरू असून पुढील तपास नशिराबाद पोलिस करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या