नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील ॲपे रिक्षा चालकांना त्रस्त करणाऱ्या बॅटरी चोरी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, नशिराबाद पोलिसांनी अल्पवयीन चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरी केलेल्या दोन बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बॅटरी चोरीचे सत्र सुरु असून,नशिराबाद परिसरात मागील दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या ॲपे रिक्षामधून बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. ह्या रिक्षा घरे वा सार्वजनिक ठिकाणी उभी असतानाच चोरट्यांनी त्यावर हात साफ केला. रिक्षा चालकांनी चोरीची माहिती मिळताच तत्काळ नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस निरीक्षक मनोरे यांनी फक्त अर्ज स्वीकारून तपास करण्याचे आश्वासन दिले.
तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. संशयाच्या आधारे एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून दोन ॲपे रिक्षांच्या बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदर मुलावर बालगुन्हेगारी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.