Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeअपघातनशिराबादमध्ये बांधकाम सुरू असताना मजुराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू.

नशिराबादमध्ये बांधकाम सुरू असताना मजुराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद गावातील भवानी नगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान दुसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ३० ऑगस्ट रोजी घडली असून दुपारी ४ वाजता त्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

सविस्तर माहिती अशी की, मृताचे नाव सादिक मेहमूद पिंजारी (वय ३५, रा. नशिराबाद) असे असून, सादिक हा मिस्त्रीकाम करून उदरनिर्वाह करत होता. सकाळी काम सुरू असताना तो अचानक दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. अपघातात त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली होती. नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात हलवले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सादिकच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून रुग्णालयात व गावात नागरिकांची गर्दी झाली होती.

या प्रकरणाची नोंद नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या