Tuesday, December 3, 2024
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद वरून जाणाऱ्या भादली-कडगाव-शेळगाव या रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार कोण? याकडे कोणी लक्ष...

नशिराबाद वरून जाणाऱ्या भादली-कडगाव-शेळगाव या रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार कोण? याकडे कोणी लक्ष देईल का?

जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह :-  जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिरासमोरील भादली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने आणि त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना जीवाची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. शेतकऱ्यांना बैलगाडी, ट्रॅक्टर, पाठोपाठ दुचाकी चालवणे ही कठीण झालेले आहे.या रस्त्याने जात असताना नागरिकांनी आमच्या पोलीस दक्षता लाईव्हच्या प्रतिनिधींना थांबवून आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या.

सविस्तर वृत्त असे की, नशिराबाद वरून भादली कडगाव आणि शेळगाव या तिन्ही गावांना जाणारा एक रस्ता असून विशेष म्हणजे हा रस्ता भादली रेल्वे स्टेशनलाही जात असून आजपर्यंत या रस्त्याची कोणीही दखल घेतलेली दिसत नाही. यावल येथे जाण्यासाठी शेळगाव मार्गे हा रस्ता निम्मे अंतराचा असून गेल्या पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण झाले होते, परंतु रेल्वे प्रशासनाचे काम चालू असताना त्यांची अवजड वाहतूक या रस्त्याने जात असल्याने रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला. तत्कालीन भुयारी मार्ग विषयी आंदोलन चालू असताना नशिराबाद येथील लोक प्रतिनिधींनी या रस्त्याविषयी रेल्वे प्रशासनाला सांगितले असता रेल्वे प्रशासनातर्फे हा रस्ता रेल्वेचे संपूर्ण काम झाल्यानंतर दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. रेल्वेचे संपूर्ण काम होऊन वर्ष उलटले तरीही त्यांनी कोणत्याही प्रकारे रस्त्याची दुरुस्ती केली नाही.

भादली रेल्वे स्टेशनचा रस्ता असून तो दुर्लक्षित का?वास्तविक हा रस्ता भादली रेल्वे स्टेशनला ही जात असल्याने रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे होते. रेल्वे स्टेशन नजीक पशुखाद्य कारखाना असून त्यांचीही अवजड वाहतूक नियमितपणे या रस्त्याने होत असते. परंतु त्यांनीही आजपर्यत या रस्त्याविष्यी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केलेला दिसत नाही असे नागरिकांनतर्फे सांगण्यात आले. वास्तविक पशुखाद्य कारखान्यामध्ये नेते मंडळींचा संचालक मंडळात समावेश असल्याने त्यांचे तेथे नित्याचे येणे जाणे असते. ते सर्व नेते मंडळी सुद्धा त्याच रस्त्याने वावरतात तरीही या रस्त्याची यापैकी कोणीही दखल घेतलेली दिसत नाही. या रस्त्याने नशिराबाद येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेतजमीन असून त्यांचे या रस्त्याने जाणे येणे नित्याचे आहे. परंतु या रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्यांना पायी चालणेही या रस्त्याने कठीण झालेले आहे.याकडे कोणी लक्ष देईल का? असा प्रश्न तेथे उपस्थित नागरिक विचारत होते.

रस्ता दुरुस्तीसाठी उपोषणाला बसण्याची नागरिकांची तयारी.

या समस्या मांडायच्या तरी कोणाकडे, जिल्हापरिषद प्रशासकीय,पंचायत समिती प्रशासकीय,नगरपंचायत प्रशासकीय याविषयी जर कोणी लक्षच द्यायला तयार नसेल तर आम्हाला आंदोलन करावेच लागणार. याविषयी आम्ही आता आमचे आंदोलन तीव्र करणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे. त्याबद्दल जिल्हाधिकारी यांना आम्ही निवेदन देणार आहोत असे संतप्त नगरिकांतर्फे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या