स्थानिक नागरिकांना दिलासा ; आरोग्य व स्वच्छता सुविधांकडे प्रशासनाचे लक्ष
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील भवानीनगर भिलवाडी नशिराबाद परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दिलासा देणारी सुविधा सुरू करण्यात आली आहे. परिसरातील ट्युबवेलमध्ये पाण्याची मोटार बसवून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून स्थानिक रहिवाशांच्या पाण्याच्या अडचणी काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.
याचबरोबर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करण्यात आली असून तेथे लवकरच पाण्याची नियमित व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः महिलांना शौचालयाचा वापर करताना पाण्याअभावी होणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.या कामाची पाहणी करताना आरोग्य सभापती चेतन बऱ्हाटे, सामाजिक कार्यकर्ते विनोद रंधे तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य सभापती चेतन बऱ्हाटे व नगरसेविका जनाबाई रंधे यांच्या प्रयत्नातून परिसरातील नागरिकांना लवकरच शौचालयासाठी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले असून भविष्यातही पाणी व स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

