नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद-भुसावळ रोडवरील टोलनाका परिसरात अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शुक्रवार रोजी एकूण तीन डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना रंगेहाथ पकडण्यात आले.जळगाव उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पकडण्यात आलेली तीनही वाहने पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन नशिराबाद येथे जमा करण्यात आली आहेत.
सदर कारवाई मंडळ अधिकारी नशिराबाद मिलिंद देवरे, मंडळ अधिकारी म्हसावद अभिजीत येवले, मंडळ अधिकारी असोदा अजिंक्य आंधळे, ग्राम महसूल अधिकारी नशिराबाद रुपेश ठाकूर, ग्राम महसूल अधिकारी कानळदा आकाश कडभाने, ग्राम महसूल अधिकारी ममुराबाद सदानंद मुंडे, ग्राम महसूल अधिकारी शिरसोली मयूर महाले तसेच वाहन चालक मनोज कोळी यांच्या सहभागातून यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
अवैध वाळू उपशावर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने अशा कारवाया अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

