नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आज दि.२३ ऑगस्ट रोजी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावित यांच्या अध्यक्षतेखाली नशिराबाद शहर व परिसरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष-कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य तसेच ईद-ए-मिलाद सण उत्सव कमिटीचे पदाधिकारी, पोलीस पाटील व पत्रकार बांधव यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
बैठकीत आगामी गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी माननीय गावित साहेबांनी गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वाद्याचा वापर करू नये तसेच गणेश मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी रात्री पदाधिकारी उपस्थित राहून दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
दरम्यान, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष श्री. रज्जाक अहेलेकार यांनी माहिती दिली की ईद-ए-मिलादची मिरवणूक दि. ८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असून याबाबत सर्व मुस्लिम समाजबांधवांनी सहमती दर्शवली आहे.
बैठकीदरम्यान पोलीस पाटील, शांतता समिती सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी आपल्या अडीअडचणी मांडल्या. त्यावर नगरपरिषद नशिराबादचे कार्यालयीन अधीक्षक श्री. आझाद पटेल, एमएसईबीचे कार्यकारी अभियंता श्री. पवन वाघुळदे यांनी योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
बैठकीला माजी सरपंच पंकज महाजन, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, डॉ. प्रमोद आमोदकर, माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गार शहर अध्यक्ष गणेश चव्हाण, विनोद रंधे,जनार्दन रोटे, गुंजन पाटील, राजेंद्र पाटील सर, सांडू पहेलवान, भूषण कोल्हे, चंदू पाटील, संदीप पाटील, अमजद खान आदी उपस्थित होते. सायं. ६.२० वाजता सुरू झालेली बैठक रात्री ७.३० वाजता संपन्न झाली.