Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeनशिराबादनशिराबाद : गोमास तस्करीचा पर्दाफाश ; अपघातातून उघड झाला प्रकार, गोमांस जप्त

नशिराबाद : गोमास तस्करीचा पर्दाफाश ; अपघातातून उघड झाला प्रकार, गोमांस जप्त

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील बालाजी लॉन शेजारी, मुंजोबा मंदिरा समोरील पाटावर गोमास तस्करी करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. भुसावळच्या दिशेने जळगावकडे भरधाव वेगाने येत असलेली मारुती अल्टो (एमएच 19 बीयू 9957) गाडी अचानक नियंत्रण सुटून दोन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला पडली. गाडीत तिन्ही प्रवासी जखमी अवस्थेत अडकून बसले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भुसावळच्या दिशेने जळगावकडे भरधाव वेगाने येत असलेली मारुती अल्टो (एमएच 19 बीयू 9957) गाडी अचानक नियंत्रण सुटून दोन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला पडली. घटनास्थळी काही वेळाने (एमएच 19 सीडब्ल्यू 3765) क्रमांकाची रिक्षा आली. त्यात तीन इसम होते. गावातील काही तरुण मदतीसाठी धावले असता, त्यांना संशयास्पद हालचाली दिसल्या. तरुणांनी पाहिले की अल्टो गाडीतून गोमांस काढून रिक्षात भरले जात होते. तातडीने गोरक्षकांना संपर्क करून ते घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यावेळेस तेथे मोटारसायकल आलेला एक इसम या वाहनांवर पाळत ठेवत होता. असे मदत करणाऱ्या तरुणांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, संधीचा फायदा घेत रिक्षातील तिन्ही इसम रिक्षा सोडून फरार झाले. नंतर गोरक्षक व पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अंदाजे 150 किलो गोमांस भरलेल्या पिशव्यांसहित दोन्ही वाहने ताब्यात घेत नशिराबाद पोलिस ठाण्यात जमा केली. अल्टो गाडीमधील कागद तपासले असता त्यात मोसिम सलीम पिंजारी हरी विठ्ठल नगर नावाने लायसन्स कॉपी मिळाली. तसेच गाडी बाबू पवार, अभोदा खुर्द, रावेर असे गाडीचे कागद मिळाले असून पोलिसांनी ते ताब्यात घेतले .

मारुती अल्टोतील जखमींना पोलिसांनी उपचारासाठी जळगाव येथे हलवले असून, नशिराबाद पोलीस पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या