वारसांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन!
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि. ८ जानेवारी २०२६ रोजी नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत जळगाव–भुसावळ जाणाऱ्या डाऊन रेल्वे मार्गावर खंबा क्रमांक ४३७/२५ ते २७ दरम्यान सुमारे २८ ते ३२ वयोगटातील अनोळखी पुरुष इसमाचा मृतदेह आढळून आला. सदर बाब भादली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर यांनी लेखी मेमोद्वारे नशिराबाद पोलीस स्टेशनला कळविली.
या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यू नुसार, कलम १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या वारसांचा शोध सुरू आहे.
सदर अनोळखी मृत इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ नशिराबाद पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढे येऊन ओळख पटवावी, असेही पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.

