नशिराबाद/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह :- रविवार दि.6 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नशिराबाद येथील गावाजवळील उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिली. या दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दिपक कडू सुर्यवंशी (वय-४५) रा.नशिराबाद ता.जळगाव असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिपक सुर्यवंशी हा तरूण पत्नी व दोन मुलींसह नशिराबाद गावात वास्तव्याला होता.दीपक गावातीलच पार्वती मेडीकल येथे कामाला होता. दीपक हा दुचाकीने रविवार 6 ऑक्टोबर रोजी भुसावळकडून नशिराबाद येथे येत असतांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दिपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. त्याच्या पश्चात पत्नी जयश्री आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.