नशिराबाद/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- आज दि.१६ जून रोजी जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा क्र.२, नशिराबाद येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत गावातून दौंडी काढण्यात आली. शिक्षणाचे महत्त्व गावकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर यामधून भर देण्यात आला.नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि बूट वाटप करण्यात आले. यानंतर उपस्थितांना गोड भाताचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्याध्यापक सुलताना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमजद खान आणि केंद्रप्रमुख मसूद सर यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.