Saturday, February 7, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यान्यू इंग्लिश स्कूल नशिराबादमध्ये ‘कलारंग २०२६’चा उत्स्फूर्त प्रारंभ

न्यू इंग्लिश स्कूल नशिराबादमध्ये ‘कलारंग २०२६’चा उत्स्फूर्त प्रारंभ

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन कलारंग २०२६ चा प्रथम दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून नशिराबाद नगरीचे नगरसेवक व बांधकाम सभापती विकास पाटील, पाणीपुरवठा सभापती कीर्तिकांत चौबे, अर्थ समिती सभापती मनोज पाटील उपस्थित होते. मंचावर संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नशिराबाद नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील, उपकार्याध्यक्षा प्रमिला महाजन, उपाध्यक्ष विनायक वाणी, सचिव मधुकर चौबे, जेष्ठ संचालक जनार्दन माळी, राजेंद्र पाटील, भोजराज पाटील, डॉ. संदीप महाजन, ॲड. प्रदीप देशपांडे, जे. वाय. महाजन, संचालिका सुनिता पाटील, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनिता बनसोडे, उपमुख्याध्यापक अनिल चौधरी, पर्यवेक्षक सुनिल पाचपांडे, समिती प्रमुख आर. ओ. चौधरी, आर. एल. पाचपांडे, एस. बी. रत्नापारखे, जे. एस. पगारे तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रविण महाजन उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नटरंग देवता व संस्थेचे माजी कार्याध्यक्ष स्व. वाय. जी. महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन व गणेश वंदना गीताने करण्यात आली. यावेळी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवलेल्या रोहनिश पाटील, रुचित माळी, देवांश कोलते व भूमेश पवार यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेस सादरीकरणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बहीण-भाऊ प्रेम, देशभक्तीपर गीत, भगवद्गीतेवरील सादरीकरण, कोळी नृत्य, ऑपरेशन सिंदूर, विनोदी गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रमाच्या मध्यंतरात शासकीय सेवेत यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थिनी यशश्री संतोष कोष्टी व गजानन मल्लिकार्जुन जंगम यांचा तसेच त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.त्यानंतर शिवबागीत, शेतकरी जीवन, भारतीय संस्कृती, वाघ्या-मुरळी नृत्य, स्वामी समर्थ गीत, गुरु महिमा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अंगावर रोमांच उभे करणारे सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन वैशाली पाचपांडे, शीतल चावरे, पूजा पाटील, सुनिता शिवरामे व जयश्री चौधरी यांनी केले. यासाठी न्यू इंग्लिश स्कूल परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या