Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबादमध्ये कुंटनखान्याचा मास्टरमाईंड अटकेत ; पोलिस पथकाची धडक कारवाई..

नशिराबादमध्ये कुंटनखान्याचा मास्टरमाईंड अटकेत ; पोलिस पथकाची धडक कारवाई..

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील टी.व्ही. टॉवर समोरील, मन्यारखेडा शिवारातील पडीक प्लॉटवरील सिमेंट काँक्रिटच्या पक्क्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकून आरोपींवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सविस्तर वृत्त असे की, या प्रकरणात दि.०५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २३.५५ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील टी.व्ही. टॉवर समोरील,  सुरू असलेल्या मन्यारखेडा शिवारातील पडीक प्लॉटवरील सिमेंट काँक्रिटच्या पक्क्या घरात आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित मुली व महिलांना वेश्याव्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत लैंगिक शोषण करून कुंटनखाना चालवित असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आरोपी १) राहुल कडू पाटील (रा. रायपूर फाटा, ता. जि. जळगाव), २) चेतन माळी (रा. स्वामी समर्थ शाळेजवळ, कुसुंबा, ता. जि. जळगाव), ३) राम विश्वास बोरसे व ४) श्याम विश्वास बोरसे (क्र. ३ व ४ रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्यातील एकूण चार आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, मास्टरमाईंड आरोपी श्याम विश्वास बोरसे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी नशिराबाद पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले होते.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त व खात्रीशीर माहितीनुसार नशिराबाद सहा.पो.निरीक्षक योगिता नारखेडे यांनी पथकास आवश्यक सूचना देऊन कारवाईसाठी रवाना केले.या कारवाईत पो.हे.कॉ.शिवदास चौधरी, पो.हे.कॉ.शरद वसंतराव भालेराव, पो.कॉ.सागर श्रावण बिडे व पो.कॉ.गणेश सुकराम गायकवाड नशिराबाद पोलीस स्टेशन यांच्या पथकाने आरोपीचा शिताफीने शोध घेऊन फरार मास्टरमाईंड आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा.पोलीस अधीक्षक सो.महेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सा.नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी सो.बारबोले यांनी संबंधित पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या