Saturday, April 4, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबादमध्ये बेकायदेशीर गोवंश मांस विक्रीवर पोलिसांची धाड; महिलेस अटक, ३ हजारांचा मुद्देमाल...

नशिराबादमध्ये बेकायदेशीर गोवंश मांस विक्रीवर पोलिसांची धाड; महिलेस अटक, ३ हजारांचा मुद्देमाल जप्त

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील फातिमा नगर परिसरात गोवंश सदृश्य मांसाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महिलेवर नशिराबाद पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली नशिराबाद पोलीस पथकाने शुक्रवारी सकाळी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३ हजार रुपये किमतीचे मांस व एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना फातिमा नगर परिसरात गोवंश सदृश्य मांसाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची गंभीर दखल घेत त्यांनी तत्काळ पथकासह कारवाईचे आदेश दिले.यानुसार पोलिस पथकाने जिया किराणा दुकानाच्या पाठीमागील भागात छापा टाकला असता, परवीन बी मुक्तार कुरेशी (वय ३७, रा. फातिमा नगर) ही महिला गोवंश सदृश्य मांसाची विक्री करताना आढळून आली. पोलिसांनी तिच्या ताब्यातून सुमारे ३ हजार रुपये किमतीचे मांस तसेच कापण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी कोयता जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर बिडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित महिलेविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.दरम्यान, ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकात शरद भालेराव, सागर बिडे, मोनाली दहिभाते, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे व रियाजोद्दीन काझी यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या