नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी नशिराबाद गावात ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक चर्चासत्र आयोजित केले. “ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम” अंतर्गत घेण्यात आलेल्या या चर्चासत्रात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
चर्चेदरम्यान गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा, खराब रस्त्यांची दुरवस्था, विशेषतः मुख्य रस्त्यांखेरीज इतर रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था, पावसाळ्यात होणारी वाहतुकीची अडचण यावर भर दिला. गावातील बहुतांश नागरिकांना या समस्या दिवसेंदिवस त्रासदायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी कृषी योजनांबाबत माहिती वेळेवर न मिळाल्याची तक्रार मांडली. योजनांचा लाभ मिळवण्यास अडचणी येत असल्याने अनेक शेतकरी सवलतींपासून वंचित राहत असल्याचे स्पष्ट केले.गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकून कृषीकन्यांनी सांगितले की, संकलित झालेल्या मुद्द्यांचे सादरीकरण नगर परिषदेकडे करून त्यावर कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्यात येतील.
“ग्रामविकासासाठी समस्यांची खरी ओळख व त्यावर चर्चा होणे ही पहिली पायरी आहे. कृषीकन्यांनी घेतलेला पुढाकार हा प्रेरणादायक असून, यामुळे गावातील संवाद वाढेल आणि ठोस निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगाने पुढे जाईल,” असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.