Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeअपघातजळगाव-भुसावळ महामार्गावर काळाचा घाला : इनोव्हा कंटेनरला समोरासमोर धडक ; महिला ठार,...

जळगाव-भुसावळ महामार्गावर काळाचा घाला : इनोव्हा कंटेनरला समोरासमोर धडक ; महिला ठार, एक जण गंभीर..

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघात घडला. जळगावकडून भुसावळच्या दिशेने निघालेली इनोव्हा कार अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. वेगात असलेल्या वाहनाने रस्त्यावरील मध्यवर्ती दुभाजक उद्ध्वस्त करत थेट विरुद्ध बाजूस प्रवेश केला आणि समोरून येणाऱ्या कंटेनरवर जोरदार आदळली.या अपघातात इनोव्हा कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेला पुरुष गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.अपघातातील मृत मुलीचे नाव झोया नदीम पठाण (रा. भुसावळ) असून, जखमी तरुण भुसावळच्या सोना डेअरीच्या मालकाचा मुलगा अरबान खान असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. दोघे भुसावळ येथील रहिवासी आहेत.

धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. अपघातग्रस्त दोन्ही व्यक्ती भुसावळ परिसरातील रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक व आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अपघात नेमका कशामुळे झाला, वेग, तांत्रिक बिघाड की अन्य कारणे याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या