Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषद निवडणूक: महायुतीत आलबेलचं प्रदर्शन ; मात्र अंतर्गत जागा वाटपामुळे ठिणगी...

नशिराबाद नगरपरिषद निवडणूक: महायुतीत आलबेलचं प्रदर्शन ; मात्र अंतर्गत जागा वाटपामुळे ठिणगी पडण्याची शक्यता!

उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष ; उठाव होण्याची शक्यता..!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-  नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी सर्वांनी मिळून महायुतीतर्फे निवडणूक लढविण्याची ठरविले असून महायुतीत सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवले जात असले तरी, महायुतीमध्ये अंतर्गत जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी न मिळाल्याने असंतुष्ट निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, काही कार्यकर्ते उठावाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काल झालेल्या बैठकीत वरिष्ठ पातळीवर सर्व मतभेद बाजूला ठेवत महायुतीची घोषणा करण्यात आली असली, तरी जागावाटपाचा प्रश्न अजूनही निकाली लागलेला नाही. काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कालच महायुती ‘आलबेल’ असल्याचे जाहीर झाल्यानंतर काही तासांतच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. “गेल्या पाच वर्षांपासून आम्ही हक्काच्या जागेसाठी तयारी केली होती. मात्र, त्या जागा महायुतीतील अन्य पक्षांना देण्यात आल्या. वरिष्ठांचा निर्णय मान्य असला तरी आमचा निर्णय योग्य वेळी घेऊ,” असे काही कार्यकर्त्यांनी पोलीस दक्षता लाईव्ह प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

काहींचे मत आहे की, “महायुतीच्या चर्चेदरम्यान वरिष्ठ नेत्यांनी स्वतःच्या जागा सुरक्षित केल्या, पण तळागाळातील कार्यकर्त्यांचा विचार केला नाही.” या पार्श्वभूमीवर महायुतीत अलबेलाचं वातावरण दाखवले जात असले तरी, अंतर्गत नाराजीची ठिणगी मोठा वाद ओढवू शकते, अशी शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या