नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील जुनी नगर परिषद परिसरातून एका भाजीपाला विक्रेत्याची मालवाहू पिकअप वाहनाची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (२ डिसेंबर) सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी बुधवारी (३ डिसेंबर) दुपारी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, विनोद दत्तात्रय चौधरी (वय ४४, रा. नशिराबाद, जळगाव) हे भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. भाजीपाला मार्केटमधून माल ने-आण करण्यासाठी त्यांच्याकडे एमएच १९ बीएम ५६२२ क्रमांकाचे मालवाहू पिकअप वाहन आहे. २ डिसेंबर रोजी त्यांनी हे वाहन जुन्या नगर परिषद परिसरात नेहमीप्रमाणे पार्क केले होते.
दरम्यान, सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधी साधत वाहन चोरून नेल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच चौधरी यांनी तत्काळ नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक कमालकर बागुल करत आहेत.

