Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद मंडळ यांचे वतीने केंद्र शासनाच्या ॲग्री स्टॅक नोंदणीचा कॅम्प संपन्न..

नशिराबाद मंडळ यांचे वतीने केंद्र शासनाच्या ॲग्री स्टॅक नोंदणीचा कॅम्प संपन्न..

नशिराबाद/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षात लाईव्ह:- केंद्र शासनाची संपूर्ण भारत भर ॲग्री स्टॅक योजना अर्थात फार्मर आयडी नोंदणीची प्रक्रिया सुरू असून त्यानिमित्ताने नशिराबाद येथे दि. 26 जानेवारी रोजी नशिराबाद मंडळ यांचे वतीने ॲग्री स्टॅक योजनेचे आयोजन करण्यात आले होते.

दि. 26 जानेवारी रोजी 10.30 वाजेपासून नशिराबाद येथील खालची आळी, विठ्ठल मंदिर परिसरात नशिराबाद मंडळ यांचेकडून शेतकऱ्यांनसाठी मोफत फार्मर आयडी नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रामुख्याने प्रांतअधिकारी मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकारी, कृषी अधिकारी, गावातील मान्यवर तसेच, नशिराबाद गावातील सेतु कार्यालय यांनी सहभाग नोंदवला. कॅम्पला उपस्थित शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला.
तसेच पहिला टप्पाची नोंदणी मुदत 31 जानेवारी असून, ज्या शेतकऱ्यांची अद्याप नोंदणी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपली फार्मर आयडी नोंद करून घेण्याचे आवाहन तलाठी रुपेश ठाकूर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या