युतीच्या वचननाम्याचे प्रकाशन ; रॅलीला भरघोस प्रतिसाद
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे भरलेल्या शिवसेना-भाजपा युतीच्या भव्य जाहीर सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विकासाचा ठोस रोडमॅप मांडत मतदारांना थेट आणि दमदार आवाहन केले. नशिराबादमध्ये आम्ही कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. म्हणूनच अधिकाराने मी तुमच्याकडे मत मागतो आहे. कारण मी उपद्रव केला नाही… फक्त विकास केला आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगत विरोधकांवर निशाणा साधला.
वाघूर धरणावरून ६० कोटींची पाणीपुरवठा योजना ; ‘प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी’
नशिराबादच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ६० कोटींची वाघूर धरणावरील पाणीपुरवठा योजना मंजूर करून तिचे काम सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. एका वर्षात नशिराबादच्या प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचणार आहे, हा माझा शब्द आहे,” असे त्यांनी म्हटले. शहराच्या एकीवर भर देताना ते म्हणाले, “मी हिंदू–मुस्लिम भेदभाव केला नाही. सर्व समाजांना समान निधी पुढेही दिला जाईल.ही निवडणूक नशिराबादच्या भाईचाऱ्याची आहे.
३०० कोटींच्या विकासकामांनी नशिराबादचा नवा चेहरा
नशिराबादसाठी ३०० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील प्रमुख कामांमध्ये ६० कोटी – वाघूर धरण पाणीपुरवठा योजना, ५० कोटी – घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी योजनासिमेंट व डांबरी रस्ते,एलईडी लाईट्स, विविध समाजासाठी सामाजिक सभागृहे, पथदिवे. मला नशिराबादचा चेहरामोहरा बदलायचा आहे आणि बदलूनच दाखवणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. वचननामा प्रकाशनावेळीही त्यांनी सांगीतले की, आम्ही निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करत नाही. आधी काम करतो आणि नंतर मत मागतो. आमचा वचननामा म्हणजे विकासाची हमी असे ते म्हणाले.

महायुतीच्या वचननाम्यात नमूद केलेले महत्त्वाचे मुद्दे.
१) शुद्ध पाणीपुरवठा — प्रत्येक घरात सुरक्षित पाणी.
वाघूर नदीवरील जलशुद्धीकरण प्रकल्पाची १००% अंमलबजावणी.
वॉर्डनिहाय पाण्याचे नियोजन व समसमान दाब.
घरोघरी पावसाचे पाणी साठवण (Rain Water Harvesting) योजना.
२) स्वच्छ व आरोग्यदायी नशिराबाद.
भूमिगत गटार व्यवस्था व सांडपाणी व्यवस्थापन
कचरा वर्गीकरण, दररोज संकलन.
डम्पिंग ग्राउंड सुधारणा.
सार्वजनिक शौचालयांची स्वच्छ व्यवस्था.
प्लास्टिकमुक्त नशिराबाद अभियान.
३) मजबूत व सुरक्षित पायाभूत सुविधा.
सिमेंट/डांबरी रस्त्यांची उभारणी. खड्डेमुक्त रस्त्यांची हमी.
नवीन मॉडर्न बस स्थानक.
फूटपाथ + सायकल ट्रॅक.
शहराचे सर्वांगीण सुशोभीकरण आराखडा.
४) सुरक्षित व सुव्यवस्थित शहर.
संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे.
स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल.
अतिक्रमणमुक्त रस्ते व पार्किंगची सुविधा.
महिला व बालक सुरक्षेसाठी विशेष उपक्रम.
५) सदृढ नागरिक — सक्षम शहर.
सर्वांसाठी मोफत अपघाती विमा.
वेळोवेळी आरोग्य शिबिरे व मोफत प्राथमिक तपासणी.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य सेवा.
आपत्कालीन मदतीसाठी नियंत्रण कक्ष.
६) शिक्षण क्षेत्रातील सुधारणा.
स्मार्ट शाळा व डिजिटल क्लासरूम.
शालेय इमारतींचे नूतनीकरण.
गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.
७) महिला सशक्तीकरण.
‘बहिणाबाई मार्ट’द्वारे महिला उद्योजकतेला प्रोत्साहन.
स्वयंसहायता गटांना आर्थिक मदत.
महिला सुरक्षा हेल्पलाइन.
काम करणाऱ्या महिलांसाठी नवीन कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा.
८) युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकास.
कौशल्य विकास केंद्र.
रोजगार मेळावे.
स्थानिक व्यावसायिक बाजारपेठ सुधारणा.
९) पर्यावरणपूरक व हरित शहर
वॉर्डनिहाय वृक्षारोपण.
आधुनिक उद्याने.
वाकी नदीकिनारी घाट विकास.
मॉर्निंग वॉक ट्रॅक.
सौर पथदिवे.
पीएम सूर्यघर योजना प्रभावीपणे राबविणार.
१०) ड्रेनेज व्यवस्था सुधारणा.
नवीन नाले व गटार योजना.
बंद नाल्यांची नियमित स्वच्छता.
पावसाळ्यात जलनियंत्रण. आराखड्यानुसार काम.
११) नशिराबाद स्मार्ट शहर सुविधा.
मोफत वाय-फाय झोन.
डिजिटल माहिती फलक.
ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली.
ई-गव्हर्नन्स सेवा.
१२) जेष्ठ नागरिक व दिव्यांग सुविधा.
विरंगुळा केंद्र उभारणी.
दिव्यांगांसाठी घरबसल्या सेवा.
रॅम्प, रेलिंग व सुलभ सुविधांची निर्मिती.
शासकीय योजना व सवलतींचा पाठपुरावा.
१३) पारदर्शक व जनसहभागी प्रशासन.
भ्रष्टाचारमुक्त कारभाराची हमी.
सहामाही कामकाजाचा अहवाल.
नागरिकांच्या सहभागासाठी. डिजिटल प्लॅटफॉर्म.
१४) धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा सुविधा.
धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण.
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुविधा.
नवीन बस स्टँड व मार्केटचे आधुनिकीकरण.
नवीन क्रीडांगण व आधुनिक व्यायामशाळा.
रॅलीला उदंड प्रतिसाद
बसस्थानकापासून नशिराबाद शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेली भव्य रॅली दीड तास शहरात दणाणून गेली. ढोल–ताशे, फटाके, जय भवानी–जय शिवाजीच्या घोषणा, ठिकठिकाणी झालेल्या औक्षणसोहळ्याने वातावरण जल्लोषमय बनले. रॅलीचे सभेत रूपांतर झाले आणि सभेलाही प्रचंड प्रतिसाद लाभला.
यांची होती उपस्थिती
या सभेस खालील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे,जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील,माजी सरपंच पंकज महाजन,विकास पाटील,शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत पाटील, भाजपा शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, माजी शिक्षण सभापती कमलाकर रोटे, शिवसेना–भाजपा युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश पाटील उर्फ पिंटू शेठ,नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवराज पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, शिवसेना-भाजपा-रिपाई महायुतीचे पदाधिकारी, जळगावचे नगरसेवक व कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन राजेंद्र पाचपांडे सर यांनी केले. प्रस्ताविक माजी सरपंच विकास पाटील, तर आभार प्रदर्शन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश पाटील उर्फ पिंटू शेठ यांनी केले. तर माजी सरपंच पंकज महाजन यांनी अत्यंत प्रभावीपणे मुद्दे मांडून शिवसेना भाजपा युतीलाच मतदान करण्याचे आवाहन केले.

