Saturday, February 7, 2026
police dakshta logo
Homeअपघातमुंजोबा मंदिराजवळ स्कॉर्पिओ-ट्रकची धडक; वाहन पलटी, अल्पवयीन जखमी

मुंजोबा मंदिराजवळ स्कॉर्पिओ-ट्रकची धडक; वाहन पलटी, अल्पवयीन जखमी

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरातील मुंजोबा मंदिर परिसरात काल रात्री 8 वाजता ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडी यात अपघात घडून त्यात स्कॉर्पिओ वाहन पलटी झाले. MH-28 V-6151 क्रमांकाच्या स्कॉर्पिओला GJ-36 X-3342 क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेत स्कॉर्पिओमधील पार्थ गावंडे (वय १७) हा अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे.अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधील कुटुंब हे तेल्हारा (ता. अमळनेर) येथील असून ते देवदर्शनासाठी अमळनेरकडे निघाले होते. वाहनात महिला व लहान मुलेही प्रवास करत असल्याने अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

दरम्यान, अपघातानंतर संबंधित ट्रकचालकाने ट्रक घटनास्थळीच सोडून पळ काढल्याची माहिती असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. तसेच अपघात झालेला ट्रक नशिराबाद पोलिस स्टेशन येथे आणण्यात आला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कार्यवाही सुरू होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या