Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद नगरपरिषद निवडणूक २०२५ : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जाहीरनामा जाहीर..!...

नशिराबाद नगरपरिषद निवडणूक २०२५ : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जाहीरनामा जाहीर..! सर्वांगीण विकासाचा संकल्प.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे जाहीरनामा जाहीर करण्यात आला. “नशिराबादचा सर्वांगीण आणि संतुलित विकास” हे केंद्रस्थानी ठेवून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, प्रकाशयोजना, आरोग्य, शिक्षण, महिला व तरुण कल्याण, शेतकरी हित, कौशल्यविकास यांसह विविध प्राधान्याच्या विषयांचा या जाहीरनाम्यात व्यापक समावेश आहे. शहराच्या वाढत्या गरजांचा अभ्यास करून सुसूत्र विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प पक्षाने व्यक्त केला आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे:-

पायाभूत सुविधा व स्वच्छता
– संपूर्ण शहरात स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा
– दुर्बळ रस्त्यांचे नूतनीकरण आणि नवीन रस्त्यांची निर्मिती
– घंटागाडी, कचरा व्यवस्थापन आणि आधुनिक स्वच्छता प्रणाली
– जुन्या गटारींची सफाई व दुरुस्ती, नवीन गटारींचे बांधकाम
– मुख्य रस्त्यांसह सर्व वाड्यांत इलेक्ट्रिक पोल व एलईडी प्रकाशयोजना

शिक्षण व आरोग्य
– शाळांची गुणवत्ता वाढविणे आणि विद्यार्थ्यांसाठी पूरक शैक्षणिक उपक्रम
– प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणे

तरुण, महिला व कौशल्यविकास
– तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा
– स्पर्धा परीक्षांसाठी वाचनालय आणि अभ्यासिकांची उभारणी
– महिलांच्या सुरक्षा, स्वावलंबन आणि प्रोत्साहनासाठी विशेष योजना
– तरुण–महिलांसाठी कौशल्यविकासातून रोजगारनिर्मिती

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व सामाजिक सुविधा
– ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, बाके व सभागृह
– दिव्यांगांसाठी विशेष सोयीसुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ

पर्यावरण व इतर सुविधा
– गावभर वृक्षारोपण मोहीम राबविणे
– बसस्थानकाचे सुशोभीकरण
– सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे मोफत वीज पुरवठ्यासाठी प्रयत्न

शेतकरी कल्याण
– नैसर्गिक आपत्तीत त्वरित मदत
– शेतकरी सहाय्यता केंद्र स्थापन

धार्मिक व सांस्कृतिक सुविधा
– सर्व धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण
– स्मशानभूमी व कब्रस्तानांना भक्कम कंपाउंड
– तीर्थक्षेत्र विकास निधीतून उद्यान व धार्मिक स्थळांचे सौंदर्यीकरण

पारदर्शक प्रशासन
– सुशासन, पारदर्शकता आणि गतिमान प्रशासन
– नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण
– अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे समस्या निवारण
– सार्वजनिक सभागृह व सांस्कृतिक भवन निर्मितीचा मानस

उत्तर सभेत नेत्यांची प्रभावी उपस्थिती
नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित उत्तर सभेला महत्त्वपूर्ण नेत्यांची उपस्थिती लाभली. धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील, पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, कार्याध्यक्ष योगेश देसले, कार्याध्यक्ष सय्यद बरकत अली, छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भीमराव मराठे, तालुका अध्यक्ष भूषण पवार, युवक तालुका अध्यक्ष सागर घुगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गणेश चव्हाण : “मी सालदाराचा मुलगा… तुम्ही मला हक्काने सांगू शकता!”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश चव्हाण यांनी जनतेला उद्देशून सांगितले विरोधकांकडून विविध प्रकारे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. पण मी सालदाराचा मुलगा आहे. तुम्ही मला हक्काने, मनमोकळेपणाने सांगू शकता. मी तुमचा माणूस आहे आणि तुमच्या पाठिंब्याने कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही.” त्यांच्या या वक्तव्यावर सभेत उपस्थित जनतेतून जोरदार प्रतिसाद मिळाला. घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले.

गुलाबराव देवकरांचा विरोधकांना जोरदार प्रतिहल्ला..
माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले “विरोधक अफवा पसरवत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘माजी’ जास्त आणि ‘आजी’ नाहीत… पण हे पूर्णपणे खोटे आहे! राज्याची तिजोरी ज्यांच्याकडे आहे ते उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत. तिजोरीची चावी अजितदादांकडे असताना नशिराबादला निधीची कमतरता पडू देणार नाही, याची पूर्ण हमी आम्ही देतो.” जिल्हाध्यक्ष संजय पवार व कार्याध्यक्ष योगेश देसले यांनीही हीच भूमिका मांडत विरोधकांचे दावे फोल असल्याचे सांगितले.एकूणच, सभा, उत्स्फूर्त जनसमुदाय आणि दमदार नेतृत्व पाहता नशिराबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

सभेत नेत्यांनी नागरिकांना घड्याळ चिन्हावर मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला विजयी करण्याचे आवाहन केले. “नशिराबादच्या प्रगतीसाठी, रखडलेल्या विकासाच्या पूर्णत्वासाठी आणि सर्वांगीण बदलासाठी घड्याळ बटण दाबा,” असे आवाहन सर्व वक्त्यांनी एकमुखाने केले. याच सभेत पक्षाचा जाहीरनामा अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या