नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील महात्मा फुले नगर व प्लॉट एरिया परिसरातील रस्त्यांची अवस्था गंभीर बिकट झाली असून, या समस्येमुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. अनेक वेळा तक्रारी देऊनही प्रशासनाकडून याकडे योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन या समस्येचे तात्काळ निराकरण करण्यासाठी नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक आझाद पटेल यांना निवेदन दिले आहे.
निवेदनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) शहराध्यक्ष गणेश नथू चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सय्यद बरकत आली, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला उपाध्यक्ष आशाताई माळी, देवदास बाविस्कर, विजय पाटील, जगन पाटील, राहुल महाजन, राहुल शालिक महाजन, राजेंद्र मराठे, गणेश महाजन, गोपाळ महाजन, वासुदेव पाटील, दीपक कोळी, प्रकाश सपके आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य समस्या:
महात्मा फुले नगर व प्लॉट एरिया परिसरातील रस्त्यांची दुरवस्था इतकी बिकट झाली आहे की, नागरिकांना रस्त्यावर चालताना व वाहने चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, रस्त्यावरील सांडपाणी पसरलेले असून, संध्याकाळी व रात्री परिसरात फटका मारणारी दुर्गंधी पसरते. अनेक वेळा नागरिकांनी हे सांडपाणी वाहून जाण्याकरिता योग्य निचरा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे, पण अद्याप या क्षेत्रात कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
शिव सह्याद्री अपार्टमेंट परिसरात सांडपाण्याची समस्या:
शिव सह्याद्री अपार्टमेंट, नशिराबाद येथील रहिवाशांनी देखील आपली मोठी समस्या मांडली आहे. अपार्टमेंटच्या समोरील सांडपाण्याची व्यवस्था अपुरी असून, हे सांडपाणी थेट शेजारील खाजगी प्लॉटमध्ये वाहून जाते. त्यामुळे केवळ दुर्गंधी निर्माण होत नाही तर सार्वजनिक आरोग्याला व पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या समस्येची तीव्रता अधिक वाढते.
या समस्येमुळे अपार्टमेंटमधील तसेच परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरीत योग्य ती उपाययोजना करून सांडपाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था करावी, ही निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे. निवेदनावर रौफ काजी मोहम्मद, राहुल शालिक महाजन, गणेश बाबूराव महाजन, गणेश नथू चव्हाण, प्रकाश शिवदास सापके, सय्यद बरकत अली, दीपक राजेंद्र कोळी, वासुदेव पाटील, राजेंद्र रामचंद्र चव्हाण
शिव सह्याद्री अपार्टमेंट परिसरातील नागरिकांची मागणी..
“शिव सह्याद्री अपार्टमेंट परिसरात सांडपाण्याची व्यवस्था अपुरी असून त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय समस्याही उद्भवत आहेत. प्रशासनाने त्वरीत योग्य ती व्यवस्था करून सांडपाण्याचा योग्य निचरा होईल, अशी व्यवस्था करावी.” अशी ग्रामस्थांतर्फे मागणी होत आहे.