Friday, March 13, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणनशिराबाद नगरपरिषदेत महिला दिनानिमित्त ‘नारीशक्ती सन्मान’ सोहळा ; स्वच्छता कामगार महिलांना साड्यांचे...

नशिराबाद नगरपरिषदेत महिला दिनानिमित्त ‘नारीशक्ती सन्मान’ सोहळा ; स्वच्छता कामगार महिलांना साड्यांचे वाटप

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नशिराबाद नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ) यांच्या वतीने ‘नारीशक्ती सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत कर्तव्यदक्ष स्वच्छता कामगार महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना साड्यांचे वाटप करून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज महाजन, महिला व बालकल्याण सभापती कमरूनिसा मन्यार, उपसभापती भारती धनगर, जनाबाई रंधे, लीना महाजन, शैला व्यवहारे, सुवर्णा महाजन, कोमल नारखेडे, हिना बी कासार, शाह हनीफा बी, शेख नशीर बानो आदी सदस्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. तसेच समाजात महिलांचे स्थान अधिक बळकट व्हावे, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या