Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषद निवडणूक 2025 : महायुतीत राष्ट्रवादीला सन्मान मिळत नसल्याने कार्यकर्त्यात असंतोष,...

नशिराबाद नगरपरिषद निवडणूक 2025 : महायुतीत राष्ट्रवादीला सन्मान मिळत नसल्याने कार्यकर्त्यात असंतोष, राष्ट्रवादी वेगळ्या निर्णयाच्या तयारीत

१५ नोव्हेंबर रोजी नशिराबाद नगरपरिषदेमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ४० नामनिर्देशन पत्र प्राप्त.

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आगामी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने एकत्र येताच राजकीय चित्र रंगत आले असले तरी, या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अन्याय होत असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी खाजगीत व्यक्त केलेल्या नाराजीमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.

माहितीनुसार, महाराष्ट्रत महायुतीमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) अपेक्षित जागा आणि मान-सन्मान मिळत नसल्याची भावना पक्षात वाढत असून त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीमधील इतर घटक पक्षांच्या रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या गाठीभेटींची माहितीही राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोहोचली असून, त्यामुळे नाराजी आणखी चिघळल्याचे समजते. नशिराबाद नगरपरिषद मध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे तगडा आणि जमलेला उमेदवार असल्याची चर्चा आधीपासून आहे. मात्र, महायुतीतील अंतर्गत राजकारण आणि माहिती दडपल्यामुळे ते शांत बसले होते. परंतु आता घडामोडींनी वेग घेतल्याने राष्ट्रवादी स्वतंत्र पाऊल उचलण्याचा गंभीर विचार करत आहे.

दरम्यान दिनांक १५/११/२०२५ रोजी नशिराबाद नगरपरिषदेमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ४० नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. आतापर्यंत एकूण ४६ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले असून येत्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन पत्र भरणाऱ्यांची सख्या वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या