Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषदेत तहसीलदार शितल राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता व निवडणूक प्रक्रियेवर मार्गदर्शन

नशिराबाद नगरपरिषदेत तहसीलदार शितल राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता व निवडणूक प्रक्रियेवर मार्गदर्शन

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येणाऱ्या नशिराबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने निवडणूक तयारीसाठी नशिराबाद नगरपरिषदेमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी मा. शितल राजपूत ह्या अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी बैठकीस नशिराबाद पोलीस ठाण्याचे API आसाराम मनोरे, ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी शितल राजपूत यांनी निवडणुकीदरम्यान लागू होणारी आदर्श आचारसंहिता, निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक, खर्च मर्यादा, तसेच आरक्षण धोरण याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. लवकरच नगरपरिषदेच्या कार्यालयात “निवडणूक मार्गदर्शन कक्ष” सुरू करण्यात येणार असून, या कक्षातून उमेदवार व नागरिकांना निवडणुकीशी संबंधित कोणत्याही अडचणींवर त्वरित मदत उपलब्ध करून दिली जाईल असे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींवर सूचना व प्रश्न उपस्थित केले. निवडणूक शांततेत, पारदर्शक व सुव्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या