नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेत राजकीय समन्वयाचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. नगरपरिषदेच्या विविध विशेष समित्या व त्यावरील सभापतींच्या निवडीसाठी १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत सर्व सहा समित्यांची निवड बिनविरोध पार पडली. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाचे स्वागत होत असून, नगरविकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासन अधिकारी तथा तहसीलदार शीतल राजपूत होत्या. यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील (पिंटू शेठ), उपनगराध्यक्ष पंकज महाजन, मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. प्रत्येक समितीवर सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.विशेष म्हणजे, समित्यांची निवड बिनविरोध झाल्यानंतर संबंधित समित्यांच्या सभापतींची अधिकृत घोषणा त्याच दिवशी करण्यात आली, अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली. ही संपूर्ण निवड प्रक्रिया शांततेत व नियोजित पद्धतीने पार पडण्यासाठी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.

विविध समित्यांवरील सभापती व सदस्यांची यादी पुढीलप्रमाणे.
स्थायी समिती (पदसिद्ध सभापती)
सभापती : योगेश पाटील.(पिंटू शेठ)
सदस्य : पंकज महाजन, विकास पाटील, मण्यार कमरुनिसा सय्यद बिस्मिल्ला, चेतन बऱ्हाटे, कीर्ती चोबे, मनोज पाटील.
सार्वजनिक बांधकाम समिती
सभापती : विकास गणपत पाटील.
सदस्य : जनाबाई रंधे, संदीप पाटील, शैला व्यवहारे, हिना बी. हो रईस कासार.
सार्वजनिक पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती
सभापती : कीर्तीकांत चौबे.
सदस्य : लालचंद पाटील, कोमल नारखेडे, लीना महाजन, मण्यार असिफ शेख गनी शेख.
सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती समिती
सभापती : चेतन बऱ्हाटे.
सदस्य : प्रदीप बोढरे, शैला व्यवहारे, संदीप पाटील, मोहम्मद इकबाल शेख इब्राहिम.
शिक्षण, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन समिती
सभापती : पंकज महाजन (उपनगराध्यक्ष)
सदस्य : सुवर्णा महाजन, प्रदीप बोढरे, शेख असलमुद्दीन एजाजुद्दीन, लीना महाजन.
नियोजन, वित्त, विकास व कर संकलन समिती
सभापती : मनोज पाटील.
सदस्य : लालचंद पाटील, शेख असलमुद्दीन एजाजुद्दीन, शाह हनीफ बी. मोहम्मद खलील, सय्यद वासीफ अली सय्यद निसार अली.
महिला व बालकल्याण समिती
सभापती : मण्यार कमरुनिसा सय्यद बिस्मिल्ला.
उपसभापती : भारताबाई धनगर.
सदस्य : सुवर्णा महाजन, कोमल नारखेडे, शेख नसरीन बानू मुस्ताक.
नगरपरिषदेतील सर्व समित्या बिनविरोध स्थापन झाल्याने आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच प्रकारे एकत्रित प्रयत्न होतील, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

