नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्या मंदिर येथे गणेशोत्सवाच्या औचित्याने सर्वप्रथम विद्यार्थ्यांमधून गणेशोत्सव मंडळाची स्थापना करून पदाधिकारी निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून कैवल्य खंडारे, उपाध्यक्ष जिज्ञासा महाजन, सचिव रुचित माळी, सहसचिव भाग्यश्री भोई तर खजिनदार म्हणून मंदार वाणी व यामिनी राणे यांची निवड झाली.
यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून एज्युकेशनल आरस साकारला. त्यानंतर श्री गणरायाची स्थापना संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक वाणी, संचालक जनार्दन माळी, राजेश पाटील, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बनसोडे, उपमुख्याध्यापक अनिल चौधरी, प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
स्थापना विधीनंतर सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. पुढील दिवसांत गणेशोत्सवाच्या काळात चित्रकला, गीतगायन, अथर्वशीर्ष पठण व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर गणेशोत्सवाचे संपूर्ण नियोजन स्वाती रोटे, नंदिनी सूर्यवंशी, संगीता जोशी व जयश्री चौधरी यांनी केले.