Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद परिसरातील पेपर मिलमुळे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न ; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे...

नशिराबाद परिसरातील पेपर मिलमुळे प्रदूषणाचा गंभीर प्रश्न ; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील गट क्र. ९४८ मध्ये सुरू असलेल्या गायत्री पेपर मिलमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या कारखान्यातून योग्य ती काळजी न घेता रासायनिक सांडपाणी व दूषित वायू थेट परिसरात सोडण्यात येत असल्यामुळे शेती, पिण्याचे पाणी तसेच आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर पेपर मिलमध्ये ETP (Effluent Treatment Plant)Scrubber यंत्रणा कार्यान्वित नसल्याने सांडपाणी व धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार, दुर्गंधी व शेतीचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधित कारखान्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केलेले प्रमुख मुद्दे..

> कारखान्यातून निघणारे सांडपाणी तपासून योग्य ती उपाययोजना करावी.

> दूषित पाणी व धूरामुळे होणाऱ्या प्रयोगशाळा तपासण्या करून अहवाल जाहीर करावा.

> रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडणाऱ्या यंत्रणांवर बंदी आणावी.

 

> तातडीने ETP व Scrubber यंत्रणा कार्यान्वित कराव्यात.

> नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.

> दूषित पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई द्यावी.

> भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी नियंत्रण यंत्रणा कार्यरत ठेवावी.

यापूर्वीही नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांनी अशाच प्रकारच्या तक्रारी वाघूर धरण विभागाकडे नोंदवल्या होत्या. वितरिका क्र. ६ मध्ये पेपर मिलचे दूषित सांडपाणी सोडल्याने शेतीचे प्रचंड नुकसान होत असून, पिण्याच्या पाण्यातही दूषितपणा वाढल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी केलेल्या या तक्रारींना प्रशासनाने गांभीर्याने घेत तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा शेतकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या