नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील परमार्थ सेवा केंद्र गीता पाठशाळेचे संस्थापक वै. सुरेश महाराज यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त परमार्थ सेवा केंद्रात ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे नियोजन केंद्राचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, भागवत कथा श्री दुर्गादास महाराज खिर्डीकर यांच्या ओजस्वी वाणीतील निरूपणातून सादर केली जात आहे.
कार्यक्रमानुसार दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण तर दुपारी ३ ते ५ या वेळेत भागवत कथेचे निरूपण होत आहे. सप्ताहाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्रीमद् भागवत पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी ह.भ.प. सुधाकर महाराज, दुर्गादास महाराज, जनार्दन माळी, पितांबर वाघुळे, राजू पाचपांडे, किशोर पाटील, अनिल चौधरी, प्रमोद पाटील, दौलत माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
पारायणासाठी परिसरातील महिला भक्तभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धाभावाने सहभागी होत आहेत. सप्ताहाच्या या धार्मिक वातावरणात भक्ती, श्रद्धा व अध्यात्म यांचा संगम अनुभवास येत आहे.