Wednesday, March 25, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद पोलीस ठाण्याच्या API पदी योगिता नारखेडे ; कायदा सुव्यवस्थेसाठी ‘झिरो टॉलरन्स’चा...

नशिराबाद पोलीस ठाण्याच्या API पदी योगिता नारखेडे ; कायदा सुव्यवस्थेसाठी ‘झिरो टॉलरन्स’चा निर्धार!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) म्हणून योगिता मधुकर नारखेड़े यांनी पदभार स्वीकारला आहे. पोलीस खात्यातील अलीकडील प्रशासकीय बदलांतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. कर्तव्यदक्षता, शिस्तप्रियता व संवेदनशील प्रशासनासाठी ओळख असलेल्या API योगिता नारखेड़े यांनी यापूर्वी विविध ठिकाणी सेवा बजावताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, महिलांसाठी सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे तसेच नागरिकांशी समन्वय साधत काम करण्यावर विशेष भर दिला आहे.

नशिराबाद हद्दीत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे, नागरिकांना त्वरित व न्याय्य दिलासा देणे हा त्यांच्या कामाचा प्रमुख उद्देश असणार आहे. गेली महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक भूमिका, गुन्हेगारांवर झिरो टॉलरन्स आणि पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांचा विशेष भर राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नशिराबाद परिसरात गुरांच्या चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असून शेतकरी वर्ग खुपच धास्तावलेला आहे. आतापर्यंत पोलिस एकही चोरीचा माग काढू न शकल्याने नागरिकांत नाराजी दिसून येत होती. त्यातच तत्कालीन API आसाराम मनोरे यांनी शेतकऱ्यांना “तुम्ही 50 लाखाचे घरे बांधू शकतात तर कॅमेरे लाऊ शकत नाही” असा अजब सल्ला दिला. त्यामुळें ते या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात आले होते मात्र ते या होणाऱ्या सलग गुरे चोरीच्या घटनांचा माघ काढू शकले नाही. त्यांच्या या अजब वक्तव्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

परंतु आता कर्तव्यदक्षता, शिस्तप्रियता व संवेदनशील प्रशासनासाठी ओळख असलेल्या महिला API योगिता नारखेड़े यांनी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे पदभार स्वीकारल्याने नशिराबाद मधील गुन्हेगारीला आळा बसेल असा नागरिकांतून विश्वास व्यक्त केला जात आहे. API योगिता नारखेड़े यांच्या नियुक्तीचे नशिराबाद परिसरात स्वागत होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याची कार्यक्षमता वाढेल आणि नागरिकांना सुरक्षिततेचा अधिक विश्वास मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या