Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणसरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त नशिराबाद येथे पोलीस विभागातर्फे आयोजित रन फॉर युनिटी’ला...

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त नशिराबाद येथे पोलीस विभागातर्फे आयोजित रन फॉर युनिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस २०२५ च्या निमित्ताने आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत नशिराबाद पोलीस स्टेशनतर्फे ‘रन फॉर युनिटी’ (एकता दौड) चे आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्या नेतृत्वात ही दौड मोठ्या उत्साहात पार पडली.

नशिराबाद पोलीस स्टेशनपासून सुरू झालेली एकता दौड संपूर्ण गावामध्ये फिरून संपन्न झाली. या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, राज्यकारिणी सदस्य राजू सोनवणे, सचिन पवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मिलिंद चौधरी, जितेंद्र महाजन, प्रा. राजेंद्र पाचपांडे, सचिन महाजन, प्रदीप देशपांडे, तुषार रंधे, गुंजन पाटील, रोहित कोलते, भरत बोंडे, दीपक लोखंडे, संदीप भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच उपनिरीक्षक गणेश कोळी, महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी व अंमलदार, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, शिक्षक, माजी सैनिक, तरुण मित्र परिवार, पोलीस पाटील, होमगार्ड, भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य अशा शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. सदरची एकता दौड शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचे अभिनंदन करून राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या