नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पोलीस स्थापना दिनानिमित्त आज गुरुवार दि. ८ जानेवारी २०२६ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीने वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली सकाळी नशिराबाद पोलीस ठाण्यापासून प्रारंभ झाली. रॅली नशिराबाद बसस्थानक, शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत चौक, इंदिरा चौक, आठवडे बाजार, होळी मैदान, स्वातंत्र्य चौक व साथी बाजार या मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा नशिराबाद पोलीस ठाण्यात समारोप झाली. या दरम्यान वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट वापर, वेगमर्यादा, मोबाईलचा वापर टाळणे आदी बाबींबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

रॅलीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत नागरिकांना सुरक्षित वाहतुकीचे संदेश फलकाद्वारे दिले. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

