Sunday, September 8, 2024
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणअंगणवाडी पोषण आहाराच्या बंद पाकिटात मेलेलं उंदराचं पिल्लू आढळल्याने खळबळ..!

अंगणवाडी पोषण आहाराच्या बंद पाकिटात मेलेलं उंदराचं पिल्लू आढळल्याने खळबळ..!

जळगाव/ मुख्य संपादक चंदन पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथे पोषण आहाराच्या बंद पाकिटात मेलेलं उंदराचं पिल्लू आढळलं असून यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून प्रशासानविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे अंगणवाडीतून पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटात मेलेलं उंदराचे पिल्लू आढळून आले आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. पोषण आहाराच्या स्वयंपाकादरम्यान तेजस्वी देवरे नामक गृहिणीच्या हा धक्कादायक असा प्रकार लक्षात आला आहे. शालेय पोषण आहाराच्या बंद पाकिटामध्ये उंदीर कसा आला हा चर्चेचा विषय झालेला असून प्रशासनाचा हा हलगर्जी पणा निष्पाप बालकांच्या जीवावर बेतला असता. या घटनेमुळे बालकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने नागरिकांसह गृहिणींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा..👇👇👇

या घडलेल्या प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई होते? पॅकिंग तसेच पुरवठादार यांच्यावरही कारवाई होणार का? यावर चौकशी समिती स्थापन करून तपासा दरम्यान दोषी आढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. कारवाई होईलच याची मात्र शंका असल्याचा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या